1.श्री एकविरा मातेला भाविक रितीरिवाजाप्रमाणे मानपान देत असतात. नवसाला
पावणारी आई एकविरा म्हणुन सर्व समाजामध्ये प्रसिद्ध आहे. चैत्र शुद्ध सप्तमीला
एकविरेचा पालखी सोहळा असतो, चैत्र शुद्ध अष्टमीला रितीरिवाजाप्रमाणे मान व
तेलवन केले जाते. चैत्र पौर्णिमा (हनुमान जयंती) या दिवशी ढाकाच्या भैरवदेवाचा
काठापालखी सोहळा येथे संपन्न होतो. ढाकाच्या भैरवाची काठी व माहेरघरची
(देवघर) आईच्या भेटीला येते. पौर्णिमेला या दोन पालख्या आल्यानंतर एकविरेची
मिरवणुक पालखीतुन काढली जाते. चैत्र महिन्यातील सोहळ्यामध्ये चैत्र शुद्ध
अष्टमीला आईचा तेलवनाचा क्रार्यक्रम तेलवनाचे पुर्वापार चालत आलेल्या मानक–
यांना मान दिला जातो. तोच मान त्यांना देवीच्या पालखी सोहळ्यात चैत्र शुद्ध
सप्तमीला खांदा देण्यासाठी मिळतो. चैत्र शुद्ध अष्टमीला रितीरिवाजाप्रमाणे मान
देऊन संपुर्ण सोहळा संपन्न होतो.
2. आश्विन महिन्यात आश्विन नवरात्रोत्सव गडावर संपन्न होतो. या काळात गडावर
घटस्थापना देवीचे पुर्वापार सेवेकरी गुरव, ब्राम्हण व विश्वस्त मंडळाच्या सहाय्याने
केले जाते. संपुर्ण ९ दिवस गडावर असंख्य भाविक येत असतात. आश्विन शुद्ध १
(प्रतिपदा) ते आश्विन शुद्ध ९ (नवमी) या कार्यकाळात गडावर पुर्वापार ब्राम्हणाच्या
हस्ते सप्तपाठपाठांतर केले जाते व आश्विन शुद्ध नवमीला होमहवन करुन
रितीरिवाजाप्रमाणे सोहळा संपन्न होतो. सदर सोहळ्याला महाराष्ट्रातील असंख्य
भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या यात्राकाळात विश्वस्त मंडळाच्या वतीने
दर्शन व्यवस्था, पाणी व्यवस्था, भजन, प्रसाद, अन्नदान व्यवस्था व जागरण
गोंधळाचा कार्यक्रम संपन्न केला जातो. अशा रितीने संपुर्ण वर्षातील चैत्र व आश्विन
नवरात्र उत्सव गडावर भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होतो.
4.त्याचप्रमाणे गडावर आई एकविरेच्या व्यतिरिक्त भगवान महादेवाचे पुरातन मंदिर,
आई कोटम्याचे स्थान, शितळादेवीचे उगमस्थान, दिपस्तंभ, पाचपायरी
पादुकास्थानअशी प्राचीन मंदिरे आहेत. सदर मंदिर व मंदिर परिसराची देखभाल
देवस्थान ट्रस्ट करत असते.
5.देवीच्या बाजुला असणारी आई जोगेश्वरी या नंनंद-भावजया म्हणुन प्रसिद्ध आहेत.
अशी ही आई एकविरा एकनाथाची कुलस्वामिनी, परशुरामाची माता, माहुरगडची
रेणुका, कार्ला स्थित वेहेरगाव मुक्कामी गडावर असुन आदीमाया, आदिशक्ती