Shree Aie Ekvira

About Us

We gather to make our commitment to become free from suffering

श्री एकविरा प्रसन्न 
  || सर्व मंगल मागल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणे नमोस्तुते ||
  
1.आपल्या महाराष्ट्रात देवी देवतांची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत, त्यामध्ये साडे तीन 
शक्तीपीठे आहेत. त्यापैकी कोल्हापुरची आंबाबाई, तुळजापुरची तुळजाभवानी, 
माहुरची रेणुकामाता तसेच अर्धपीठामध्ये नाशिकची सप्तश्रृंगीमाता अशी 
साडोतीन शक्तीपीठे आहेत. त्यातील माहुरगडाच्या रेणुकामातेचा अवतार (अंश) 
म्हणुन कार्ला येथील एकविरा मातेचे स्थान प्रसिद्ध आहे, हे स्थान कार्ल्याच्या 
डोंगरावर एका अखंड शिलेत प्रकट झालेले आहे.
2.श्री एकविरा देवीचे स्थान हे फार पुरातन म्हणजे कार्ला लेणीच्या अगोदरचे असुन 
स्वयंभु आहे म्हणजेच लेणीच्या अगोदर ते पांडवकालीन म्हणुन प्रसिद्ध आहे. 
मंदिराच्या बाजुला बौद्ध कोरीव लेणी आहे. काही ग्रंथांमध्ये श्री एकविरा हे 
एकनाथाची कुलस्वामिनी होती. पुराणात जामदासी ऋषिंची पत्नी रेणुका हीला पाच 
पुत्र होते. त्यातील एक शुरवीर पराक्रमी असा परशुराम होता, त्यामुळे तिला 
परशुरामाची माता एकविरा असे अख्यायतेत आहे. श्री एकविरा ही स्वयंभु 
पाषाणातुन प्रकट झालेली असुन तिचे मुख उत्तरेला आहे. तिला शेंदुर आवडतो, 
त्यामुळे तिचा देह शेंदुरचर्चित आहे व जलदेविता म्हणुन ज्यांचा पाण्याशी संबंध 
येतात अशा कोळी, आग्री यांना पावणारी एकविरा म्हणुन प्रसिद्ध आहे तसेच श्रद्धा 
असणा-या सर्व भाविक भक्तांच्या नवसाला पावणारी म्हणुन प्रसिद्ध आहे.
3.दरवर्षी चैत्र व आश्विन महिन्यामध्ये देवीची यात्रा भरते. चैत्र महिन्यातील चैत्र शु. 
प्रतिपदेपासुन म्हणजेच गुढीपाडव्यापासुन यात्रेला प्रारंभ होतो व चैत्र शु. सप्तमीला 
श्री एकविरा मातेचा मोठा पालखी सोहळा महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या 
उपस्थितीत गडावर संपन्न होतो. हा सोहळा खुप अविस्मरणीय असतो. या 
सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील सर्व समाजातील लाखो भाविक गडावर येतात व 
सोहळ्याचा आनंद घेतात. 
4.देवीच्या डोंगराच्या पायथ्यापासुन २ ते ३ किमी अंतरावर देवघर म्हणुन एक गाव 
असुन त्याला देवीचे माहेरघर म्हणतात. कारण तिचा भाऊ श्री काळभैरव यांचे 
भव्य देवालय या ठीकाणी आहे. तेथे चैत्र शु. षष्टीला देवाची पालखी निघते, त्या 
दिवशी तेथे मोठी यात्रा भरते.  
 

 About us 

1.श्री एकविरा मातेला भाविक रितीरिवाजाप्रमाणे मानपान देत असतात. नवसाला 
पावणारी आई एकविरा म्हणुन सर्व समाजामध्ये प्रसिद्ध आहे. चैत्र शुद्ध सप्तमीला 
एकविरेचा पालखी सोहळा असतो, चैत्र शुद्ध अष्टमीला रितीरिवाजाप्रमाणे मान  
तेलवन केले जाते. चैत्र पौर्णिमा (हनुमान जयंती) या दिवशी ढाकाच्या भैरवदेवाचा 
काठापालखी सोहळा येथे संपन्न होतो. ढाकाच्या भैरवाची काठी  माहेरघरची 
(देवघर) आईच्या भेटीला येते. पौर्णिमेला या दोन पालख्या आल्यानंतर एकविरेची 
मिरवणुक पालखीतुन काढली जाते. चैत्र महिन्यातील सोहळ्यामध्ये चैत्र शुद्ध 
अष्टमीला आईचा तेलवनाचा क्रार्यक्रम तेलवनाचे पुर्वापार चालत आलेल्या मानक
यांना मान दिला जातो. तोच मान त्यांना देवीच्या पालखी सोहळ्यात चैत्र शुद्ध 
सप्तमीला खांदा देण्यासाठी मिळतो. चैत्र शुद्ध अष्टमीला रितीरिवाजाप्रमाणे मान 
देऊन संपुर्ण सोहळा संपन्न होतो. 
2. आश्विन महिन्यात आश्विन नवरात्रोत्सव गडावर संपन्न होतो. या काळात गडावर 
घटस्थापना देवीचे पुर्वापार सेवेकरी गुरव, ब्राम्हण  विश्वस्त मंडळाच्या सहाय्याने 
केले जाते. संपुर्ण  दिवस गडावर असंख्य भाविक येत असतात. आश्विन शुद्ध  
(प्रतिपदा) ते आश्विन शुद्ध  (नवमी) या कार्यकाळात गडावर पुर्वापार ब्राम्हणाच्या 
हस्ते सप्तपाठपाठांतर केले जाते  आश्विन शुद्ध नवमीला होमहवन करुन 
रितीरिवाजाप्रमाणे सोहळा संपन्न होतो. सदर सोहळ्याला महाराष्ट्रातील असंख्य 
भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या यात्राकाळात विश्वस्त मंडळाच्या वतीने 
दर्शन व्यवस्था, पाणी व्यवस्था, भजन, प्रसाद, अन्नदान व्यवस्था  जागरण 
गोंधळाचा कार्यक्रम संपन्न केला जातो. अशा रितीने संपुर्ण वर्षातील चैत्र  आश्विन 
नवरात्र उत्सव गडावर भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होतो. 
3.ज्या दगडात देवीने आपले रुप प्रकट केले आहे, तो दगड अखंड लेणीच्या 
दगडातील एक भाग आहे. आतील गाभारा हा संपुर्ण दगडात कोरला असुन पुढील 
मंदिराचे बांधकाम इ.स.१८८६ सालात करण्यात आले. सदर काम एका कोळ्याने 
केले असे म्हणले जाते. 
4.त्याचप्रमाणे गडावर आई एकविरेच्या व्यतिरिक्त भगवान महादेवाचे पुरातन मंदिर, 
आई कोटम्याचे स्थान, शितळादेवीचे उगमस्थान, दिपस्तंभ, पाचपायरी 
पादुकास्थानअशी प्राचीन मंदिरे आहेत. सदर मंदिर  मंदिर परिसराची देखभाल 
देवस्थान ट्रस्ट करत असते.  
5.देवीच्या बाजुला असणारी आई जोगेश्वरी या नंनंद-भावजया म्हणुन प्रसिद्ध आहेत. 
अशी ही आई एकविरा एकनाथाची कुलस्वामिनी, परशुरामाची माता, माहुरगडची 
रेणुका, कार्ला स्थित वेहेरगाव मुक्कामी गडावर असुन आदीमाया, आदिशक्ती 
तिला आपण स्मरुण करु.